राजे रामराव महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ.एस.एस.पाटील यांची नियुक्ती


जत,प्रतिनिधी: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे राजे रामराव महाविद्यालयांच्या प्रभारी प्राचार्य पदी तासंगावचे डॉ.एस.एस पाटील यांची निवड करण्यात आली.

        महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ विठ्ठलराव ढेकळे यांच्या बदली नंतर प्राचार्य पदाची धुरा डॉ आप्पासाहेब भोसले यांच्याकडे सोपविण्यात आली होती.चार महिन्यांच्या कालावधीघ नंतर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाची धुरा डॉ एस.एस.पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

        पदभार स्विकारल्यानंतर नूतन प्रभारी प्राचार्य डॉ एस.एस.पाटील म्हणाले की,माझी प्रभारी प्राचार्य पदी निवड केल्याबद्दल मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्याचा आभारी आहे.संस्थेच्या ध्येय धोरणानुसार संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व गुरुदेवांना सोबत घेऊन विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्व स्थरावर ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आसल्याचे डॉ एस एस पाटील सर बोलताना म्हणाले.

          यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समव्यक डॉ शिवाजी कुलाळ,प्रा. एस एस चव्हाण,प्रा.एम.एच. करेन्नवार व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments