तालुक्यातील अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या त्वरित भरा; खा. संजय पाटीलजत,प्रतिनिधी: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज रोजी सांगली जिल्ह्याचे खासदार संजय (काका) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जत पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. 

         यावेळी तालुक्यातील अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या भरण्याच्या सूचना खासदार पाटील यांनी दिल्या. जत तालुका हा विस्ताराने व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा तालुका आहे. ही खूप मोठी अडचण आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाठीमागील बॅकलॉग भरून घ्यावा. सध्या राज्यात ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा आहे. सर्व नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांची तात्काळ दखल घ्या, कारण रुग्ण वाचला पाहिजे. सर्व आरोग्य उपकेंद्रास सक्त सूचना द्या, हलगर्जीपणा बिलकुल चालणार नाही, रुग्णांना उपचार करण्यास वेळ घालवू नका, अशा सक्त सूचना खा.पाटील यांनी आरोग्य विभागाला दिल्या. 

       यावेळी आशा वर्करच्या कामाचे कौतुक खासदार संजयकाका पाटील यांनी केले. तिकोंडी उपकेंद्रात कर्मचारी वाढवण्याची मागणी जि. प. सदस्य सरदार पाटील यांनी केली. रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कांबळे म्हणाले की, जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नसतात. ज्या ठिकाणी कोविड सेंटर उभे केले आहे, त्याठिकाणी बाथरूमची व्यवस्था नाही, कोणत्याही सुविधा नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे कोविड सेंटर करावे अशी मागणी केली.

       यावेळी आ.विक्रमसिंह सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटी, संखचे अप्पर तहसीलदार तथा जतचे तहसीलदार हणमंत म्हैत्रे, गट विकास अधिकारी अरविंद धारणगुत्तिकर, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय  बंडगर, जि.प.सदस्य सरदार पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिरादार, बाबासाहेब कोडग, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments