रुद्राक्षा फौंडेशनकडून 130 व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार साध्या पद्धतीने बुध्द विहार, तोंडोली येथे रुद्राक्षा फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मेणबत्ती लावून बुद्ध प्रार्थना केली, त्यानंतर फौंडेशनचे संस्थापक अश्विनी खलिपे यांनी सर्वांना घरी राहा, विनाकारण बाहेर पडू नका, तसेच मास्क, सॅनिटायजरचा वापर करा आणि सुरक्षित अंतर ठेवा. स्वतःची व आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले. तसेच आदर्श शिक्षिका सौ.शोभा खलिपे म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला राज्यघटनेच्या रूपाने अनमोल देणगी दिली आहे. त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, सर्वांनी त्याचा आदर करायला हवा. भारत हा विविधतेने नटलेला विविध जाती धर्मात विभागलेला जरी देश असला तरी या देशातील शोषितांच्या वंचितांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले आयुष्य खर्च केले आणि त्यांनी दिलेल्या संविधानाचा वापर समाजात सर्वांनी कल्पकतेने करायला हवा तरच समाजात परिवर्तन घडेल.

यावेळी संस्थापक अश्विनी खलिपे, आदर्श शिक्षिका सौ.शोभा खलिपे, पूनम सोनताटे, शरद सोनताटे, श्रीकांत खलिपे, पूजा सोनताटे, निकिता सोनताटे, नेहा लोंढे, विश्वास सोनताटे, रामचंद्र सोनताटे, दीपक सोनताटे, विशाल लोंढे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments