आवंढी येथील ग्रामसेविका श्रीमती एस पी शिंदे यांचा मनमानी कारभार


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील आवंढी येथील ग्रामसेविकेचा मनमानी कारभार व बोगस मासिक ठराव करून घरकुल लाभार्थी पात्र-अपात्र ठरवल्या प्रकरणी गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदन दिले आहे.
       निवेदनात, ग्रामपंचायत आवंढीचे ग्रामसेविका श्रीमती. एस. पी. शिंदे ह्या सरपंच यांना हाताशी धरुन मनमानी कारभार करत आहेत. मासिक सभा दिनांक २५/०१/२०२१ रोजी मासिक सभेत घरकुल पात्र व अपात्र या विषयावर कोणतीही चर्चा झालेली नाही. तरी ग्रामसेवक श्रीमती. एस. पी. शिंदे यांनी उराव क्र. ०७ अन्वये दिनांक २५/०१/२०२१ मासिक सभेत बोगस ठराव करुन लोकांची घरकुल अपात्रचा ठराव दाखवून तो यादीसह पंचायत समिती जत येथे सादर केलेला आहे. आम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी विचारले असता हा ठराव झालाच नाही. अशां उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. आम्ही ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती जत येथे जावून ग्रामसेवक श्रीमती. एस. पी. शिंदे यांनी दिलेला ठराव पंचायत समिती जत मधील अधिकारी बजंत्री यांना मागीतला असता त्यांनी त्याची झेरॉक्स प्रत आम्हाला दिली.
       ती प्रत घेऊन ग्रामसेवक श्रीमती. एस. पी. शिंदे यांना विचारले असता त्यांनी हा ठराव मी केलेलाच नाही. असे सांगुन आम्हाला ग्रामपंचायत कार्यालयात अपमानीत करुन बाहेर जाण्यास सांगीतले. तरी ग्रामसेवक श्रीमती. एस. पी. शिंदे हे ग्रामपंचायत सदस्यांची तसेच ग्रामस्थांची फसवणुक करत आहेत. तसेच ग्रामसेविका शिंदे ह्या कर्तव्यात कसूर करुन बेकायदेशीर काम करत आहेत. सदरचा ठराव ग्रामपंचायत सदस्यांनी कधीही व कोणत्याही सभेमध्ये आज अखेर घेतलेला नाही. त्यामुळे आवंढी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने सुरु असलेला कारभारावर आपले मार्फत योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी लवकरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटणार असल्याचे म्हटले आहे. या निवेदनवर ग्रा. प. सदस्य प्रदीप कोडग, लालसो देशमुख,मुगाबाई कोडग, रत्नमाला कोडग यांच्या साह्या आहेत.

१४ व १५ वा वित्त आयोग व दलित वस्तीचा निधी भरपूर शिल्लक आहे. त्याचा वापर ग्रामपंचायतीकडून झालेला नाही. तसेच ग्रामसेवक श्रीमती. एस. पी. शिंदे हे ग्रामपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत हजर राहत नाहीत. सरपंच व उपसरपंच यांना हाताशी धरुन फक्त  त्यांच्या मर्जीतील लोकांची कामे  करण्याचा उद्योग सुरु असुन सर्वसामान्यांना जाणीवपुर्वक त्रास देत आहेत.

Post a Comment

0 Comments