अवाजवी खर्च टाळून एक अंकी व्याजदर करा ।महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे निवेदन


जत,प्रतिनिधी: सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने इमारत, फर्निचर, संगणक वरील अवाजवी खर्च टाळून एक अंकी व्याजदर करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने शाखाधिकारी विकास साबळे यांना दिले आहे.
        निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सन २०१९-२० ची जनरल सभा होत असून ही सभा कोरोना महासंसर्गामुळे लांबलेली होती. जनरल सभा घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे. ही सभा ६८ वी जनरल सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. ह्या सभेची नोटीस प्रसिद्ध झाले असून. ह्या सभेतील विषय पत्रिकेत मुद्दा क्रमांक ९ नुसार जागा, इमारत, फर्निचर, संगणक खरेदीकरिता मंजूरी घेणेंबाबत विषय आला आहे. या विषयास महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने विरोध केला आहे. त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे की, जो पर्यंत संचालक मंडळ व्याज दर एक अंकी करत नाही. तो पर्यंत फर्निचर, जागा इमारत, संगणक इत्यादी वरील अनावश्यक बाबी टाळावे. आपण सभासदांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. जोपर्यंत व्याज दर कमी होत नाही. तोपर्यंत अनावश्यक बाबी टाळून शिक्षक बँकेचा कारभार काटकसरीने करावा. सध्या इतर बँका सॅलरी कर्ज बिगर शेअर्स कर्ज देत आहेत. आपण ही विशिष्ट रक्कम मर्यादा करून शेअर्सच्या शिवाय कर्ज देऊन सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावे. यासह आदी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने चेअरमन सांगली जिल्हा शिक्षक सहकारी बँक यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे.
        यावेळी शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष- संतोष काटे, शिक्षक नेते-पी.एस. ऐवळे, जत तालुकाध्यक्ष-सुनिल सुर्यवंशी, जिल्हाकार्याध्यक्ष-दिलीपकुमार हिंदुस्थानी,मलेशप्पा कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments