माडग्याळ येथील शेळी-मेंढी आठवडी बाजार भरवला । मार्केट कमिटीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

जत,प्रतिनिधी: जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु माडग्याळ येथील शेळी-मेंढी आठवडी बाजार जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून मार्केट कमिटीने भरवला.

           मार्केट कमिटीच्या या भोंगळ कारभाराने शेतकऱ्यांना लाखो रुपयचा गंडा बसला. माडग्याळ येथील सरपंच, उपसरपंच यांनी मार्केट कमिटीला बाजार का चालू केला असा जाब विचारला असता ग्रामपंचायतचा आणि मार्केट कमिटीचा काहीही संबंध नाही, असे उद्धट उत्तर मार्केट कमिटीचे कर्मचारी देत होते. मार्केट कमिटीच्या सचिवांना विचारले असता, आम्हाला कोणताही लेखी आदेश प्राप्त झालेला नाही. आदेश प्राप्त नसल्यामुळे आम्ही बाजार चालू ठेवला असे सांगितले.

           माडग्याळ बाजार चालू असल्याचे उमदी पोलिसांना समजताच उमदी पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले. बाजारामध्ये गर्दी झाल्याने व पोलिस आल्याने शेतकरी घाबरून पळाले. मार्केट कमिटीला कंपाऊंड असल्याने शेतकरी शेरावैरा पळू लागल्याने अनेकांचे शेळी, मेंढी हातातून निसटून गेले, चेंगराचेंगरी झाली. अनेकांचे पैसे पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ह्या नुकसानला जबाबदार कोण असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे.


उमदीचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी मार्केट कमिटीला बाजार भरवू नका असे सांगितले. परंतु, आम्हाला शासनाचा स्वतंत्र आदेश नसल्याने आम्ही बाजार चालू ठेवला आहे. असे नामदेव दांडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जतचे आमदार विक्रम सावंत यांनीही बंदचा आदेश असतानाही माडग्याळ बाजार कसा चालू केला असा प्रश्न मार्केट कमिटीच्या अधिकारी यांना विचारला.

Post a Comment

0 Comments