कागनरी येथे गॅस स्फोट: उमदीतील प्रहार संघटना धावली मदतीलाजत,प्रतिनिधी:  जत तालुक्यातील कागनरी येथे गॅसचा स्फोट झाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. त्यांना प्रहार संघटनेच्यावतीने मदत देण्यात आली. कागनरी येथील देवाप्पा हरिबा राठोड यांच्या छप्परवजा घरात गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात गरीबाचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यामुळे प्रहार संघटनेच्या उमदी येथील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी करून राठोड कुटुंबीयांना तातडीची मदत दिली. उमदी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार यांच्या मार्गदशनाखाली प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनिल बागडे, प्रहार संघटनेचे उमदी चे अध्यक्ष सुनिल सातपूते, गनप्पा सातपुते, जोतिबा सातपुते, शरद सातपुते आदि उपस्थीत होते. तेव्हा त्यांनी राठोड यांना तातडीने सर्वांनी मदत करावी असे आवाहन प्रहार संघटनेने केले आहे.

Post a Comment

0 Comments