खैरावमध्ये गॅसचा स्फोट: पत्र्याचे घर जळून खाक - मानव मित्र संघटनेकडून मदत

 


जत,प्रतिनिधी: खैराव ता. जत येथे गॅसचा स्फोट होऊन दीपक बाळू ढगे यांचे पञ्चाचे घर जळून खाक झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेत ढगे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

       या घटनेची माहिती मिळताच चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज हे तातडीने खैराब येथे येऊन ढगे कुटुंबीयांना धीर दिला व त्यांना मदतीचा हात दिला. खैराव येथे दीपक ढगे यांचे पत्र्याचे घर आहे. शनिवारी ढगे यांच्या घरातील महिला गॅसवर दूध तापवत असताना गॅसने अचानक पेट घेतला व काही कळायच्या आत गैसचा स्फोट झाला.

        या गॅस स्फोटात काही वेळातच पत्र्याच्या शेडला आगीने वेढले. या दुर्घटनेत ढगे यांनी घरात आणून ठेवलेले रोख १ लाख ७५ हजार रुपये, तीन तोळे सोने, दीड ते दोन लाखाचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत ढगे कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कर्नाटक येथे निघालेले चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी खैराव गाठले. ढगे कुटुंबीयांना बाबांनी धीर देत त्यांना मदतीचा हात दिला. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने मदतीचा हात दिला. घटना घडल्यानंतर अर्धा तासातच बाबा खैरावमध्ये दाखल झाले व त्यांनी ढगे कुटुंबीयांना मदत केली. यावेळी खैरावचे सरपंच राजाराम घुटूकडे, पोलीस पाटील कांताबाई पाटील, भारत क्षीरसागर आदि उपस्थित होते.

  • गॅस स्फोटातील वाढ चिंताजनक; तुकाराम बाबा महाराज-
  • जत तालुक्यात गॅस स्फोट व जळीतग्रस्तांच्या घटनेत वाढ होत आहे. ही बाब चिंताजनक आहे. तालुक्यातील मोटेवाडी उटगी, कागनरी, तिकोंडी, उमराणी, येळदरी, काराजनगी, आसंगी तुर्क, प्रतापूर, पांडोझरी आदि गावांत जेथे आशा घटना घडल्या आहेत तेथे श्री संत बागहेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तातडीने मदत केली आहे. या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार ध्यावा, असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांना केले आहे.

Post a Comment

0 Comments