जत । शेड्याळ येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन


जत,प्रतिनिधी: शेड्याळ ता.जत येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामनिधी (रेग्युलर) फंडातून ११ लाख रुपये खर्च करून नवीन व्यायाम शाळेची उभारणी केली आहे. गावातील तरुण युवकांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी व गावातील युवकांच्यातून तरुण खेळाडू निर्माण व्हावे तसेच युवकांनी व्यसनापासून दूर राहून युवकांच्या मध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतीने एक वेगळा उपक्रम राबवला आहे.

           या व्यायाम शाळेचे उद्घाटन नूतन सरपंच अशोक जाधव उपसरपंच भगवानदास केंगार नुतन ग्रामपंचायत सदस्य कर्यीपा गुगवाड, भाऊसो जाधव, शामराव थोरात, विध्याधर जाधव, म्हाळापा हावगोंडी, तमाणा गुगवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

          यावेळी महादेव तेली, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तुकाराम डपिन, नागेश हावगोंडी, संतोष नरुटे, केंचापा गुगवाड, राजू तेली, माजी सैनिक संजय किरगत, शहाजी जाधव, ग्रामसेवक कादर खान पठाण, ग्रामपंचायत कर्मचारी बिरू जावीर, नागनाथ कसबे, अशोक तेली, यांच्यासह गावातील तरुण युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments