स्व.डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यस्मरणार्थ मोफत वह्यांचे वाटपजत,प्रतिनिधी: स्व. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या तृतीय पुण्य स्मरणार्थ जत तालुक्यातील २५०० विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप करण्यात आले.

         भारती विद्यापीठाचे सर्वे सर्वा स्व. पतंगरावजी कदम यांच्या तृतीय पुण्य स्मरणार्थ भारती विद्यापीठामार्फत जत शहरातील एस आर व्ही एम हायस्कूल, जत हायस्कूल, कन्या हायस्कूल, के एम हायस्कूल, जि. प. उर्दू शाळा, जी. मराठी शाळा नंबर एक व दोन व जी प कन्या प्रशालेतील एकूण २५०० विद्यार्थ्यांना मोफत वहीचे वाटप करण्यात आले.

         यावेळी भारती विद्यापीठाचे प्राचार्य सी.एस.भिंताडे, आ. विक्रम सावंत यांचे चिरंजीव धैर्यशील सावंत, जत तालुका काँग्रेस अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगरसेवक भूपेंद्र कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments