कृषी अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील सन २०१९-२० मध्ये भाऊसाहेब फुंडकर योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे तात्काळ वर्ग करण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी हणमंत मेडीदार यांनी दिल्यानंतर मनसे चे उपोषण मागे घेण्यात आले.
           सन २०१९-२० मध्ये भाऊसाहेब फुंडकर योजने अंतर्गत लाभार्थी म्हणून निवड झालेल्या लाभार्थीना सदर योजनेचा लाभ अदयाप मिळालेला नव्हता. यासाठी मनसेच्या वतीने वारंवार निवेदने व विचारणा करूनही टाळाटाळ करण्यात आल्याने मनसे ने जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणस सुरवात केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी हणमंत मेडीदार यांनी मनसेच्या आंदोलन स्थळी येऊन पात्र लाभार्थींच्या खात्यावर तात्काळ पैसे सोडतो असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
         यावेळी कृष्णा कोळी, मिलिंद टोणे, मनोज साळे यांच्यासह मनसेचे अधिक कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments