डीप्लोमा ग्रॅज्युएट जर्नालिस्ट स्टुडंट असोसिएशनच्या सदस्याना मिळणार आर्थिक मदतीचा हात- नितीनभाऊ बडेकरजत वार्ता न्यूज: डिप्लोमा ग्रज्युएट जर्नालिस्ट स्डुडंट असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्याना संकटाच्या काळात असोसिएशच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देवून त्यांच्या सुखदूखात सहभागी राहून त्यांना असोसिएशनच्या वतीने अर्थसाह्य करण्याचे प्रतिपादन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ बडेकर यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, आजच्या पत्रकाराला कोणी वाली राहीला नसुन, स्वाभिमानी पत्रकार आपल्या रक्ताचे थेंब आठवून बातमीदारी करतात. त्यांच्या भविष्याची चिंता कोणीच करताना सहसा दिसत नाही. तरी असोसिएशनच्या माध्यमातून संघटीत पत्रकांच्या आडीआडचणी जानून घेवून. भवीष्य काळात गरीब गरजु पत्रकारांना व असोसिएनच्या पदाधिकार्‍याना अडचणीच्या काळात अर्थिक मदतीचा हात देवून त्या पत्रकार व सदष्यांच्या सोबत राहून त्यांना शक्य होईल तेवडी मदत करु अशे प्रतिपादन बडेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments