काराजनगीतील जळीतग्रस्त चिमबाई घाटे कुटूंबियांना प्रकाश जमदाडे यांची मदत


जत,प्रतिनिधी: काराजनगी ता.जत  येथील जाळीतग्रस्त चिमाबाई सुरेश घाटे (कोळी) कुटुंबीयांन सोलापूर रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी संसारपयोगी साहित्याची मदत केली. तसेच प्रशासनाकडून ही मदत मिळवून देऊ असे सांगितले.
         घाटे यांचे काराजनगी गावापासून काही अंतरावर घर आहे. ज्वारी च्या सुगीचे दिवस असल्याने घरी कोणी नव्हते. अचानक दुपारी १ वाजताच्या सुमारास छप्पर वजा राहते घर आगीत जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
         या आगीत कपडे व जीवनावश्यक वस्तुसह संसरूपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये अंदाजे १ लाख ६५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. जमदाडे यांनी केलेल्या लाख मोलाच्या मदतीमुळे घाटे कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी निगडी सोसायटीचे चेअरमन कृष्णा शिंदे, माजी चेअरमन सोसायटी धनाजी जाधव, उपसरपंच उमाजी जाधव, शिवाजी मोहिते, काडगोंडा बिराजदार, गुंडोपंत धोडामोळ, अशोक सावंत आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments