जत । भिवर्गीत द्राक्षबाग वाऱ्यामुळे जमीनदोस्त १७ लाखाचे नुकसानजत,प्रतिनिधी: भिवर्गी ता.जत येथील काशिनाथ मल्लाप्पा सुतार या शेतकऱ्याची काढण्यासाठी आलेली द्राक्षबाग वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे सुमारे पंधरा ते सोळा लाखाचे नुकसान झाले आहे. 

        अधिक माहिती अशी की, शेतकरी काशिनाथ सुतार यांची जमीन भिवर्गी फाट्यापासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत आहे. तेथे तीन एकर द्राक्ष बाग केली होती. एकशे वीस दिवस पूर्ण झाल्याने द्राक्ष मार्केटिंगसाठी विकण्यात येणारे होती. बागेत सुमारे ५५ टन द्राक्ष होती. बाजारभावाप्रमाणे जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने अचानक वादळी वारा बागेत घुसल्याने मांडवाचे तार तुटून खांब कोसळले त्यात द्राक्ष बाग जमीनदोस्त झाले.

         द्राक्षासह झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोटच्या पोराप्रमाणे द्राक्ष बाग जगवली होती. डोळ्यासमोर द्राक्ष बाग कोसळल्याने काशिनाथ सुतार यांना मोठा धक्का बसला आहे. याची माहिती मिळताच कृषी अधिकारी एस.एम.कोष्टी, व तलाठी बाळासाहेब जगताप यांनी पंचनामा केला आहे.

         यावेळी भिवर्गीचे सरपंच मदगोंडा सुसलाद, उपसरपंच बसगोंडा चौगुले, पोलिस पाटील श्रीशैल चौगुले, सोसायटी अध्यक्ष श्रीकांत बिराजदार, कोतवाल श्रीशैल धंदरगी अन्य शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments