म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी अखेर जत तालुक्यात दाखल


जत,प्रतिनिधी : म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यातून अखेर जत तालुक्यात मंगळवारी सकाळी पाणी दाखल झाले. यावर्षी प्रथमच कृष्णामाई जत तालुक्यात अवतरली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून म्हैसाळ योजनेचे पंप सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

          मिरज, कवटेमहांकाळ, तासगाव मार्गे जत तालुक्यात पाणी दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसात तालुक्यात उन्हाचा तडाका जाणवू लागल्याने हंगामी पिके सुकू लागली आहेत. मात्र म्हैसाळ सिंचन योजनेतून आलेल्या या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून पाणी पोहचणार्या सर्व भागातील तलावे, बंधारे, नालाबांध भरून द्यावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

         दरम्यान तालुक्यातील मुख्य कॅनॉल बिळूर, देवनाळ पोट कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन अधिकारी करत आहेत. तालुक्यात मुख्य कॅनॉलपासून सुरू होणाऱ्या अनेक बधिस्त पाईपलाईन उपयोजनाची कामे पूर्णत:कड़े आली आहेत. या योजनेतूनही पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आहे. या योजनाच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात जमिनी ओलिताखाली येणार आहेत.

Post a Comment

0 Comments