जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा; शिक्षक महासंघाचे निवेदन


जत,प्रतिनिधी: जत तालुका पंचायत समिती येथे भेटून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बरोबर विविध प्रश्नांवर केली चर्चा जत तालुक्यातील प्राथ. शिक्षकां च्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा होऊन तात्काळ निर्णय घेण्यात यावा या मागणीचे निवेदन सांगली जिल्हा शिक्षक संघ व जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने संयुक्तिक  प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर डी शिंदे यांना देण्यात आले. 

          निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकांचे सेवा पुस्तके अद्यावत करून केंद्रनिहाय कॅम्प घ्यावेत. मासिक पगार व प्रलंबित बिले तात्काळ अदा करण्यात यावीत. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव केंद्रनिहाय आढावा घेऊन 31 मार्च अखेर प्राप्त शिक्षकांची प्रस्ताव घेऊन निवड श्रेणी साठी प्रशिक्षणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी, जिल्हा स्तरावरून  प्राप्त अनुदानानुसार प्राथमिक शिक्षकांची बरेच वर्ष न मिळालेली फरक बिले तात्काळ अदा करण्यात यावीत. प्राथमिक शाळेतील न्यायालयीन प्रकरणाची तड लावण्यासाठी व शाळांवरील अन्याय दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळांची बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक करण्यात यावी. जत तालुक्यातील जवळजवळ अडीचशे-तीनशे प्राथमिक शिक्षकांचे इन्कम टॅक्स रक्कम खात्यावरती जमा दिसत नसून,  यामध्ये तालुका प्रशासनाच्यावतीने गांभीर्याने लक्ष घालून ज्या त्या शिक्षकांच्या पॅन खात्यावरती रकमा आढावा घेऊन  तात्काळ जमा करण्यात याव्यात असे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ ता. जत (शि.द.) गटाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावर गट शिक्षणाधिकारी आर डी शिंदे यांनी वरील सर्व विषयावर तात्काळ चर्चा करून गांभीर्याने आढावा घेऊन प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवू असे संघटनेच्या पदाधिकारी शिष्टमंडळास आश्वासन दिले आहे.

         यावेळी  शिक्षक महासंघाचे अध्यक्ष माननीय माधवराव सांगली जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माननीय मुकुंद सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस सुनील कायदा सल्लागार धनराज पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश जत तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर,जत तालुका सरचिटणीस गुंडा मुंजे, जत तालुका कार्याध्यक्ष  तानाजी टेंगले अशोक चव्हाण,दत्तात्रय साळे,भालचंद्र गडदे, जिल्हा सल्लागार जैनुद्दीन नदाफ,उत्तम लेंगरे,अमजेद नाईक, रियाज अत्तार,मनोहर येऊल, ,विष्णू ठाकरे, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  • जत तालुका विस्ताराने  मोठा असून 29 केंद्रांचा कार्यभार असणाऱ्या तालुक्यात इतर तालुक्यांच्या मानाने पर्यवेक्षनीय यंत्रणा कमी असून तात्काळ मराठी व कन्नड भाषांचे विस्ताराधिकारी नेमण्यात यावेत. जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या इन्कम टॅक्स रकमा तात्काळ खात्यावर जमा नाही झाल्यास जत तालुका शिक्षक संघाच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारन्यात येईल.

Post a Comment

0 Comments