व्हसपेट येथे झालेल्या हॉलीबॉल(शुटिंग बॉल) सामन्यात माळशिरस संघाने मारली बाजी


जत,प्रतिनिधी:  हजरत दावलमलिक बाबा पीर यांच्या उरुसा निमित्त व्हसपेट ता.जत येथे भव्य हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, यावेळी अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी आपल्या संघासह हजेरी लावली. अत्यंत रोमांचकारी सामने यावेळी पहावयास मिळाले. दरम्यान प्रथम क्रमांक माळशिरस (सोलापूर)च्या अमिर काझी या संघाने पटकावला तर दुसरा क्रमांक धरणगुत्ती कोल्हापूर , व तिसरा क्रमांक खानापूर येथील संघाने पटकावला. याशिवाय पुढील पाच विजेत्या संघास उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.

          यावेळी हॉलीबॉल असोसिएशन चे मुख्य पंच रमेश पवार, सहाय्यक पंच प्रशांत पवार यांनी काम पाहिले व अत्यंत जबाबदारीने सर्व सामने पार पाडले. दरम्यान जत चे हॉलीबॉल पटु मौला शेख यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून सर्व खेळाडू व प्रेक्षकांना मास्कचे वाटप केले. अतिशय उत्कृष्ट सामने यावेळी पहावयास मिळाले व शेवटी आपला दिमाखदार खेळ दाखवत माळशिरस (सोलापूर)च्या अमिर काझी या संघाने प्रथम विजेत्या चा मान पटकावला. यावेळी उपस्थित व्हसपेट चे सरपंच रामभाऊ साळुंखे ,जत चे राष्ट्रीय खेळाडू तुकाराम मासाळ सर, मौला शेख, बंडोपंत निळे, आदिलशहा पटेल, श्रीकांत हुवाळे सर, प्रविन कांबळे, सचिन झेंडे पत्रकार, केराप्पा हुवाळे पत्रकार, राजु वाघमारे, जेष्ट खेळाडू मुबारक नदाफ, बापु हुवाळे, जगन जाधव सर, संतोष चौगुले विनायक मनिमुले राजु सनदि सह सर्व कार्यवाहक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समालोचनाचे काम महादेव हुवाळे सर, व सचिन झेंडे पत्रकार यांनी केले.

Post a Comment

0 Comments