संख येथे १३ वर्षीय शाळकरी मुलाचा विहिरीत पडून मृत्यूजत,प्रतिनिधी: संख ता.जत येथील मृत दत्तात्रय लालू व्हटकर (वय १३ रा.संख ता.जत) हा शाळकरी मुलगा दुपारी अंदाजे दोनच्या सुमारास शेळ्या राखत असताना विहिरीत पडून मृत्यू झाला. 

       अधिक माहिती अशी कि, संख गावापासून २ कि मी अंतरावर व्हटकरवस्ती आहे. तेथे स्वतःच्या शेतात शेळ्या राखण्यासाठी गेला असता दत्तात्रय लालू व्हाटकर वय १३ याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तो इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत होता. दत्तात्रय याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे कळते. घटनास्थळी उमदी पोलीस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार सुनील गडदे करत आहेत.

Post a Comment

0 Comments