जत तालुक्यातील ज्वलंत प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडू; आ. सावंत


जत,प्रतिनिधी: जत तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी 126 गावांपैकी 116 गावात मुख्यमंत्री जलमिशन योजनेतून माणसी 55 लिटर पाणी उपलब्ध करून देणार असून तालुक्यातील सर्व तलाव भरून घेण्यासाठी जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी तात्काळ बैठक घेणार असल्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी टोणेवाडी येथे नूतन ग्रामपंचायत सदस्या व पदाधिकारी यांचा सत्कार कार्यक्रमप्रसंगी सांगितले.

     यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जत तालुका हा अत्यंत दुर्गम व दुष्काळी भाग असून या तालुक्यातील ज्वलंत प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये-विधानसभेत मांडू. जत तालुक्यात टोणेवाडी हे एकमेव गाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून या गावातील विकासकामासाठी येत्या आठ दिवसात 25 लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते टोणेवाडी गावातील नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, उपसरपंच कमल घोडके, दिपक अंकलगी, प्रवीण तोडकर, विष्णू नुलके, रतीलाल नुलके, चांगुना नुलके, वैशाली हिप्परकर, वसंत टोणे, अनिता टोणे, तुकाराम व्हलगुळे, गोरख टोणे, आप्पासाहेब टोणे, माजी सरपंच मोतीराम टोणे, मधुकर टोणे, पत्रकार नितीन टोणे, आदिंसह टोणेवाडी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments