वक्रतुंड महिला बचतगट व रुद्राक्षा फौंडेशन यांच्यावतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमसांगली: जागतिक महिला दिनानिमित्त हनुमाननगर, सांगली येथे वक्रतुंड महिला बचतगट व रुद्राक्षा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता बाहेर कुठेही न जाता महिलांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना रोजच्या त्याच त्या दिनचर्येत काहीतरी बदल मिळावा म्हणून आणि महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी-कुंकू, उखाणे म्हणणे, कृतीवरून शब्द ओळख, पिलो पासिंग, फुगडी, तसेच स्वतःला येत असेल त्या कलेचे सादरीकरण असे अनेक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.

         याबवली सौ.राधा माळी अध्यक्षा, वक्रतुंड महिला बचतगट, सौ.अनिता माळी सचिव, वक्रतुंड महिला बचतगट, अश्विनी खलिपे, रुद्राक्षा फौंडेशन अध्यक्ष, सौ.अनिता शिंदे, सौ.रिजवना नदाफ, सौ.सुमती रानभोरे, सौ.मालाश्री कुंदगोळ, सौ.कमल बिसूरकर, सौ.उज्वला बिसूरकर, सौ.शकुंतला सुतार, सौ.कमल जाधव, सौ.पुजा साळुंखे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments