येळदरी येथील माने कुटूंबियांना आ विक्रमसिंह सावंत यांच्याकडून मदत


जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील येळदरी येथील जळीतग्रस्त सिद्राया माने कुटूंबियांना आमदार विक्रमसिंह सावंत यांचेकडून संसार उपयोगी साहित्याची मदत करण्यात आली. 

         येळदरी मानेवस्ती येथे शुक्रवारी दुपारी झोपडीवजा कुडाचे घरास आग लागून झालेल्या नुकसानीत माने कुटूंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. या आगीत संसारपयोगी साहित्य, रोख रक्कम, तीन तोळे सोने, शेळी, दोन कोकरु, एक दुचाकी जळून खाक झाले होते. यामध्ये सुमारे दहा लाखाचे नुकसान झाल्याने माने कुटुंब उघड्यावर पडले आहे. यामुळे त्यांना आर्थिक साहाय्य व धीर देण्याच्या हेतूने आ.सावंत यांनी संसार उपयोगी साहित्याची मदत देऊन माने कुटूंबियांस धीर दिला.

         यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, सरपंच राम सरगर, दानम्मादेवी जत तालुका शेतकरी सहकारी दूध संघ संचालक रावसाहेब मंगसुळी, व ग्रामस्त उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments