प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आ. सावंत यांची जत मध्ये आढावा बैठक


जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महा आवास अभियान, जल जीवन मिशन व १५ वा वित्त आयोग योजने अंतर्गत शाळा व अंगणवाडी नळ कनेक्शन देणे तसेच कार्यशाळा आदी योजनांचा आढावा आमदार विक्रमसिंह सांवत यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सरदार पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

        प्रत्येक योजना कोणत्याही अडचणी शिवाय लाभार्थ्यापर्यंत पोहचली पाहिजे, योजनेपासून गावांचा विकास हा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे तालुकास्तरीय अधिकारी, स्थानिक ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावि. तालुक्यात आलेला निधी, योजने बाबतच्या अडचणी, प्रशासकीय परवानग्या, स्थानिक विषय मार्गी लावण्यासाठी या आढावा बैठकीचे पंचायत समिती गणनिहाय आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.सावंत यांनी सर्वांच्या समस्या जाणून घेतत्या व त्या तात्काळ सोडविण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, संबधित विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments