पेट्रोल, डिझेल दरवाढ व शेती विषयक कायद्याचा निषेध करत जत तालुका वंचित बहुजन आघाडीने दिला आंदोलनाचा इशारा


जत,प्रतिनिधी: केंद्र सरकारने केलेले शेती विषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. तसेच पेट्रोल व डिझेल इंधनाची दरवाढ रद्द करण्यात यावेत यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जत तालुक्यातील पदाधिकारी यांनी प्रशासकीय कार्यालयाना निवेदन दिले. 

          या निवेदनाद्वारे वंचित बहुजन आघाडी ने सरकारला विनंती केली की,आपण करत असलेली पेट्रोल व डिझेल दरवाढ या सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. कोरोणा महामारी व लॉकडाऊन यामुळे सर्व सामान्य नागरिकांना जिवन जगणेही मुश्किल झाले आहे. या काळात अनेकांना आपल्या नोकरी तसेच काहिंना आपले नातेवाईक गमवावे लागले आहे. काहींचे छोटे मोठे व्यवसाय ही बंद पडले आहेत. यातच डिझेल, पेट्रोल व गॅस अशा इंधनाची होणारी दरवाढ हि अन्याय स्वरुपाची आहे. ती रद्द करावी तसेच शेतकऱ्यांच्या विरोधात अन्यायकारक  कायदे पास केलेले आहेत. ते रद्द करण्यात यावेत या मागण्या सरकार पर्यंत पोहचवावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच याचा पाठपुरावा ही वरीष्ट कार्यालयात करावा. वंचित बहुजन आघाडी ने केलेल्या या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला. 

         यावेळी वंचित बहुजन आघाडी चे ता. अध्यक्ष अमोल साबळे, सौ. संध्या गौतम कांबळे, सौ.अरुणा राजु कांबळे, सौ.वंदना सुरेश चौगुले, सौ.नकुसा राजु कोळी, जकाप्पा सर्जे, नितीन शिवशरण, सुरज साबळे, जयेश कांबळे, जुबेर मंगळवेढे, सुरेश कोळी, शरद शिवशरण, आदित्य वाघमोडे, बुद्ध सागर सर, विनोद साबळे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments