उटगीत चुलत्याचा पुतण्याकडून अंगावर गाडी घालून खून


जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील उटगी येथे घडलेल्या घटनेत ग्रामपंचायत उटगीचे तंटामुक्त समितीचे सदस्य मल्लप्पा धुंडाप्पा केसगोंड वय 52 यांचा संशयित आरोपी पुतण्या भालचंद्र सिद्धप्पा केसगोंड यांनी टेम्पो अंगावर घालून खून केल्याची नोंद उमदी पोलिसात करण्यात आली आहे.

         याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, उटगी ता. जत येथील अंकलगी तलावाच्या जवळ मल्लप्पा धुंडाप्पा केसागोंड हे स्वतःच्या मालकीच्या शेतात कुटुंबियांसह राहतात. केसगोंड हे उटगी ग्रामपंचायत चे तंटामुक्त समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते, ते उटगी येथील अंबा भवानी नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. बुधवारी रात्री सायंकाळी आठ ते साडे आठ च्या दरम्यान मल्लप्पा केसगोंड हे आपल्या दुचाकीवरून उटगी ते चनगोंड रस्त्यावरून घरी जात असताना मागील बाजूने टेम्पो ने धडक दिली. मल्लप्पा यांना 20 फुटा पर्यंत फरफटत नेले मल्लप्पा गंभीर जखमी झाले. वाटेवरुन ये जा करण्याऱ्या नागरिकांनी त्यांना प्राथमिक उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. टेम्पोच्या चाकात मल्लप्पा यांची दुचाकी अडकली दरम्यान टेम्पो चालक संशयीत आरोपी पुतण्या भालचंद्र सिद्धप्पा केसगोंड यांनी अपघात स्थळापासून तब्बल पाचशे मीटर पर्यंत टेम्पो नेत थांबवुन पळ काढला. या खुनाच्या घटनेस शेत जमिनीचा वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेची नोंद उमदी पोलिसांत करण्यात आली असून अधिक तपास सपोनि दत्तात्रय कोळेकर हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments