वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत महाविद्यालयास पुस्तके भेट


जत,प्रतिनिधी: कॉग्रेसचे जत शहर युवक अध्यक्ष, युवक नेते आकाश बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराकडून जत येथील राजे रामराव महाविद्यालयत ५० हजार रुपये किमतीचे स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकाचा संच भेट देण्यात अला. यावेळी जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निलेश बामणे, मिथुन माने, शोहेब नायकवडी, सुमित जगधने, सनी गडीकर, प्रमोद मोरे, प्रवीण सरगर, अनुराग साळे, अभिषेक बनसोडे, प्रा.सिद्राम चव्हाण, ग्रंथालय प्रमुख अभय पाटील या सर्वांच्या उपस्थितीत राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब भोसले यांच्याकडे पुस्तके सुपूर्द करण्यात आली. 

          यावेळी युवक नेते आकाश बनसोडे बोलताना म्हणाले की, जत मधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. परंतु परिस्थितीनुरूप योग्य मार्गदर्शन व सुविधांची वानवा असल्याने त्यांना या क्षेत्रात वाटचाल करताना अडचणी येत असतात. अशा होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जत येथील राजे रामराव महाविद्यालयास ५० हजार रुपयांची स्पर्धात्मक परीक्षांची पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. ही सर्व पुस्तके नवीन अभ्यासक्रमानुसार निवडलेली आणि दर्जेदार आहेत. याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा तसेच सन्माननीय जत तालुक्याचे भाग्य विधाते आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या विचारातून व मार्गदर्शनामुळे आम्हाला ही प्रेरणा मिळाल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

          यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य आप्पासाहेब भोसले म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशाची वाट सुलभ करणारा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत भावी पिढीच्या प्रगतीसाठी आकाश बनसोडे यांच्या सामाजिक दृष्टिकोनाचा आदर्श सर्वांनी घेतल्यास जत तालुक्यातून उद्याचे प्रशासकीय अधिकारी निर्माण होतील असा आशावाद व्यक्त केला. अनेकांनी अशा प्रकारे उपक्रम करावेत व भावी पिढीला योग्य मार्ग दाखवावा असे प्राचार्य भोसले बोलताना म्हणाले.

Post a Comment

0 Comments