माजी आमदारांसह भाजपचे पदाधिकारी रोजगार हमी योजनेतील दरोडेखोर? । जत तालुका कॉंग्रेस कमिटी


जत,प्रतिनिधी: आ. विक्रमसिंह सावंत यांचा राजीनामा मागणारे हे सर्वच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील दरोडेखोर आहेत, हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्हापरिषद, पंचायत समितीत आमदार सत्तेत आल्यावर हे सर्व भाजपचे पदाधिकारी रोजगार हमीचे दरोडेखोर आहेत. हे जत तालुक्यातील जनतेला माहिती आहे. आरोप करणारे सर्वच भाजप पदाधिकारी अधिकाऱ्यावर दबाव टाकून बेकायदेशीर कामे मंजूर करून कामे केली. रोजगार हमीच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. त्यात हे सर्व आरोप करणारे दरोडेखोर सामील आहेत. त्यांच्यामुळे 'चोराला सोडून संन्याश्याला फाशी' असे जत पंचायत समितीचा प्रथम श्रेणी असलेला गटविकास अधिकारी व त्यांच्या समवेत अनेक अधिकारी कर्मचाऱ्या वर भाजप दरोडेखोरांमुळे फौजदारी कार्यवाही झाली. त्यांना नाहक त्रास झाला. हे सर्व पाप तत्कालीन भाजपचे पदाधिकारी व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या आशीर्वादाने झाले. हे तालुक्यातील आम जनतेला माहिती आहे. रोजगार हमीच्या भ्रष्टाचारामुळे तालुक्यातील सर्वात मोठी विकासाची गंगोत्री असणारी रोजगार हमी योजना बंद पडण्याचे काम या लोकांनी केली. आज भाजपचे आम्ही एकसंघ म्हणणारी मंडळी अलिबाबा व त्याचे चाळीस चोर या कथेप्रमाणे काम केलेले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हि मंडळी स्वताची खळगी भरण्यासाठी भाजपा म्हणून घेणाऱ्यांनी वेगवेगळी चूल मांडून आम जनतेला फसवले हे हि जनतेला माहिती आहे. कॉंग्रेस पक्षाचे उमेदवर जनतेशी नाळ जुळवून अनेक वैयक्तिक व सार्वजनिक कामे केल्याने आतापर्यंतच्या विक्रमी मताने निवडून आल्याने त्यांच्या पोटात पोटसूळ उठले आहे. आज एकत्र आलेली भाजपची उंदरे अनेक बिळात आतापर्यंत होती. आता आम्ही एकत्र आलो आहे. असे जनतेची दिशाभूल करत आहे. काहीही लायकी नसताना आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर टीका करतात त्यांनी स्वत एजेंट असणाऱ्याने लायकी तपासून घ्यावी. अशी टीका जत तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.

        जत तालुक्यात पावसापूर्वी पूर्व भागातील तलाव भरण्यासाठी कर्नाटक राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री मा.एम.बी.पाटील यांच्याकडे विक्रमसिंह सावंत आमदार नसताना अनेक वेळा माणुसकीच्या दृष्टीने शक्य होईल तेवढे दुष्काळी भागाला पाणी द्या अशी विनंती केली. त्यामुळे तुबची बबलेश्वर योजना चालू ठेऊन पूर्व भागातील अनेक तलाव भरून दिले. हे त्याभागातील लाभार्थी शेतकऱ्यांना चांगले माहित आहे. टीका करण्यापूर्वी त्या भागातील शेतकऱ्याकडे जाऊन माहिती घेऊन टीका करावी. आज भाजपचे सर्व पदाधिकारी नगरपालिकेचे नगर सेवक कामे सुचवू शकतात परंतु त्यास निधी आणण्यासाठी आमदारांचे प्रयत्न व शिफारस लागते. हि बाब आपल्या माजी आमदारांना विचारून घ्या. माहिती न घेता लुंग्या सुंग्याला टीका करायला लावण्याचा धंदा भाजपने बंद करावा.

       गेल्या पंचवार्षिक विधानसभेच्या कारकीर्द मध्ये भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शेवटच्या वर्षी विधानसभेत तालुक्यातील जिवंत प्रश्न न मांडता दोन मिनिटाच्या वेळेत तालुक्यातील अवैद्य धंदे यावर औचित्याचा मुद्दा मांडला. याशिवाय एकही ज्वलंत प्रश्न मांडला नाही. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दीड वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या तिन्ही अधिवेशनात तालुक्यातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या व्यथा सभागृहात व्यक्त केल्या हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे. आमदार सावंत याना पाणीदार आमदार म्हणून आम जनता भूषण दिलेले आहे. हे पाहून आपल्या पोटात दुखत आहे. जत तालुक्यातील  कॉंग्रेस पक्षाचा आमदार आत्तापर्यंतच्या तालुक्यातील आमदारांपैकी हुशार, तरुण, तडफदार असून चांगले काम करत आहेत. विरोधी पक्षाच्या माजी आमदार जुने झाल्याने त्यांच्याकडून या तालुक्यात काही काम होणार नाही. आमच्या पक्षात आमच्यावर टीका करणाऱ्या लोकांसारखे वाळू तस्कर, अवैद्य धंदे करणारे कॉंग्रेस पक्षात नाहीत. भाजप मधले वाळू तस्कर, अवैद्य धंदे वाल्यांचे दुकान बंद पडल्याने खोटे-नाटे आरोप करणाऱ्या शिवाय त्यांच्याकडे दुसरे काम नाही. यापुढे लुंग्या सुंग्याची टीका खपवून घेतली जाणार नाही. कॉंग्रेस पक्ष एकसंघ आहे. आपल्या पक्षात एक पडळकर गट, चंद्रकांत पाटील गट, विलासराव जगताप गट, संजय काका पाटील गट असे ४ घरात राहणाऱ्या मंडळींनी आमच्या घराकडे बोट दाखवू नये. यावेळी जत तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिरादार, जत तालुका कॉंग्रेस कार्याध्यक्ष सुजय (नाना) शिंदे, जि.प.सदस्य महादेव पाटील, माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग, माजी मार्केट कमिटी सभापती संतोष पाटील, सांगली obc सेल्स जिल्हा अध्यक्ष तुकाराम माळी सर, जत मार्केट कमिटी माजी सभापती अभिजित दादा चव्हाण, माजी नगरसेवक महादेव कोळी, विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. युवराज निकम, माजी नगरसेवक निलेश बामणे, मारुती पवार, माजी बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे, मल्लेश अण्णा कत्ती, युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष विकास माने, जत शहर कॉंग्रेस अध्यक्ष आकाश बनसोडे, दादासाहेब दुधाळ, राजू यादव, समाधान शिंदे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments