आ. सावंत यांच्याकडून तिकोंडीतील गॅस स्फोटातील कुटूंबाला मदतजत,प्रतिनिधी: तिकोंडी ता.जत येथे गॅस चा स्फोट होऊन काशीबाई बसाप्पा चौधरी यांचे घर जाळून खाक झाले होते. या नुसकानीची पाहणी करून विक्रम फाउंडेशन कडून धनादेश देत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी चौधरी कुटूंबाला मदत केली.

         अधिक माहिती अशी की, तिकोंडी ता.जत येथे गॅस चा स्फोट होऊन काशीबाई बसप्पा चौधरी यांचे छप्परवजा पत्र्याचे घर जाळून खाक झाले होते. यामध्ये सुमारे पाच ते सात लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये २५ हजार रोख रक्कम,संसार उपयोगी साहित्य,२५ रुपये किमतीची बागेची औषधें ,२ तोळे सोने,२ तोळे चांदी व ५ पोती ज्वारी जळली आहे. वेळीच सावध झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरी कुटुंबाकडे स्वतःचे कपडे सोडून त्यांच्याकडे काहीच शिल्लक उरले नाही. या पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त मदत प्रशासन व इतर माध्यमातून करावी अशी मागणी होत आहे.

         यावेळी माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग, विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम, उपसरपंच बसवराज पाटील, रायाप्पा रचगोंड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments