तालुक्यात पुन्हा वाढत असलेल्या कोरोनो रुग्णांमुळे प्रत्येकाने कोरोना जनजागृती करणे आवश्यक; आ. सांवत

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यात पुन्हा कोरोनो रुग्णांची संख्या वाढत असल्याने जनजागृती करण्यासाठी शहरातील प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या वार्डात फिरून जनजागृती करावी तसेच तालुक्यातील प्रत्येक गांवातील सरपंच व उपसरपंच यांनी गावात जनजागृती करणे आवश्यक आहे.

          जत तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर आ.सांवत यांनी तहसीलदार कार्यालयात बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनजागृतीचे काम करणे आवश्यक असुन यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी तसे आदेशच काढावे अशा सुचना आमदार सांवत यांनी तहसीलदार कार्यालयातील आढावा बैठकीत दिल्या. तसेच आज पर्यंत कोरोना वाढू नये यासाठी तालुक्यातील अधिकारी यांनी काय उपाय योजना केल्या याची माहीती आ. सांवत यांनी जाणुन घेतल्या. जतच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या कोरोना लाटेत प्रभावी काम केले आहे. त्यांच्यावर पुन्हा नवी जबाबदारी आली आहे. सर्वानी दक्ष राहून नवी लाट थोपविण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आवाहन आ.सांवत यांनी केले.

          यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील, पोलीस निरिक्षक उत्तम जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर, बाजार समिचीचे सहायक सचिव सोमलिंग चौधरी, पंचायत समिती व नगरपरिषदचे अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments