पत्नीला वाचवण्यास गेलेल्या पतीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू


जत,प्रतिनिधी: मायथळ ता.जत येथे पिठाच्या चक्कीची साफसफाई करत असताना विजेचा शॉक लागलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा पांडुरंग इराप्पा भुसनुर( वय. ४५) यांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर पत्नी सुरेखा पांडुरंग भुसनूर या गंभीररीत्या 

जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

         याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रविवारी होळी सणानिमित्त पांडुरंग भुसनुर यांच्या पत्नी सुरेखा घरातील साफसफाई करत होत्या. दरम्यान त्या पिठाच्या चक्कीची साफसफाई करत असताना अचानक शॉक लागल्याने आरडाओरड केली. आवाज ऐकताच पती पांडुरंग त्या ठिकाणी गेले व पत्नीचा बचाव व्हावा म्हणून विजेची केबल खेचत असताना त्यांना विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत पत्नी सुरेखा या जखमी झाले असून त्यांच्यावर माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments