जतचा पाणीप्रश्न मंत्री जयंत पाटील सोडवतील - खासदार संजयकाका पाटील । आसंगी जत येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटनजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मंत्री जयंत पाटीलच सोडवतील यासाठी लवकरच आमदार विक्रमसिंह सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांना बरोबर घेऊन मंत्री जयंत पाटील यांची लवकरच बैठक घेतली जाईल असे खासदार संजयकाका पाटील हे  आसंगी जत येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

खासदार पाटील पुढे म्हणाले की, जत तालुक्यातील जनतेने मला खूप मोठी साथ दिली आहे.जनतेची कामे करताना कधीही राजकारण आड आणू नये जनतेने आपल्याला कामे करण्यासाठी निवडून दिले आहे आसंगीचे सुपुत्र सरदार पाटील यांनी गावासाठी खूप चांगली कामे केली आहेत. त्यांचे कौतुक करावे तिथके थोडे आहे.जत पूर्व भागातील जो पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी विद्यमान आमदार आणि माजी आमदार विलासराव जगताप यांना सोबत घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून निश्चत कामे पूर्ण केली जातील.

आमदार  सावंत म्हणाले की, जत तालुक्याला कोणत्याही पध्दतीने पाणी आले तर चांगलेच आहे.४२ वर्षांनंतर तालुक्याच्या काही गावात पाणी आले.विस्तारित म्हैसाळ योजनासुद्धा जरी चांगली असली तरी सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपयांचा निधी मिळणार कधी? कामे कधी होणार?यात आणखी दोन पिढ्या जाणार असल्याची शक्यता आहे.यापेक्षा कर्नाटक राज्यातून दोन टीएममसी पाणी जरी मिळाले तरी तालुक्याच्या पूर्व भागात पाणी येऊ शकते. त्यामुळे काही भागात म्हैसाळ योजनेतून तर काही ठिकाणी कर्नाटकातून पाणी मिळाल्यास पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.योजनेची काही कामे खा.संजयकाकांच्या माध्यमातून झाली आहेत.उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी केंद्राची गरज भासल्यास संजयकाकानी मदत करावी.श्रेयवादात शक्ती खर्च करण्यापेक्षा जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नासाठी सर्वांनी एकत्रित येऊ या असे आवाहन आमदार सावंत यांनी करत संगीत ग्रामपंचायत इमारत खूप छान झाली असल्याचे गौरवोद्रार काढले याच धर्तीवर जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायत इमारतीस मंजुरीसाठी दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

जि.प.सदस्य सरदार पाटील म्हणाले की, माडग्याळ परिसरातील जे तलाव आहेत ते म्हैसाळ योजनेतून भरण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.यासाठी एखादी योजना राबवावी कारण पूर्व भागातील तुबची - बबलेश्वर योजना ही पूर्व भागातील गावासाठी लाभदायी ठरेल. पण माडग्याळ सह आठ गावांना पाणी देण्यासाठी तलाव भरून घेण्यासाठी काम करावे लागेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनीही जतच्या पाण्याचा प्रश्न मांडताना या भागात केलेल्या कामाचा उल्लेख केला व खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून मोठी अपेक्षा आहेत. यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हा परिषद सभापती प्रमोद शेंडगे,केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक व माजी सभापती प्रकाश जमदाडे,जि प सदस्य सरदार पाटील, सरपंच श्रीमंत पाटील,माजी सभापती मंगलताई जमदाडे, उपसभापती विष्णु चव्हाण ,पं स सदस्या सुप्रिया सोनुर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments