सन २०२१ मध्ये होणा-या जनगणनेमध्ये लिंगायत धर्माची इतर धर्माप्रमाणे स्वतंत्र जनगणना करणेत यावीजत,प्रतिनिधी: सन २०२१ मध्ये होणा-या जनगणनेमध्ये लिंगायत धर्माची इतर धर्माप्रमाणे स्वतंत्र जनगणना करणेत यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन जत तहसिलदारसो याना देण्यात आले. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, तुकाराम माळी, प्रदीप वाले, पट्टणशेट्टी, राजेंद्र माळी आदीजन उपस्थित होते.

        लिंगायत धर्माची स्थापना १२ व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांनी केली. जगाला समतेची व बंधुत्वाचा विचार महात्मा बसवेश्वरानी दिला. अनुभव मंडपाची स्थापना करून लोकांना लोकशाहीचे महत्व पटवून दिले व लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणुन लिंगायत धर्मास १२ व्या शतकामध्ये विज्जळ राजाकडुन राज मान्यता मिळवली. तेव्हापासुन हिदुस्तानमध्ये अनेक शाहामध्ये खिलजीशाही, वहामनीशाही, मोगलशाही, विदरशाही, निजमाशाही, कुतुवशाही, आदीलशाही या सर्व राजशाहयांनी लिंगायत धर्मास मान्यता दिली. यानंतर हिंदवी स्वराज्यमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लिंगायत धर्मास पुढे राजाश्रय दिला व मान्यता दिली. पुढे पेशव्यांनी इंग्रजांनी लिंगायत त्यास मान्यता दिली व इंग्रजांनी तर शासन पीकमान्यता दिली. इंग्रजांनी सन १८७१ पासुन हिंदुस्थानमध्ये जनगणेस सुरूवात केली. तेव्हांपासुन १९३१ पर्यंत इंग्रजांनी लिंगायत धर्माची इतर धर्माप्रमाणे स्वतंत्र जनगणना केली. इंग्रजांनी जनगणनेमध्ये लिंगायत धर्मातील पोट जाती, वाणी, तेली, माळी, साळी, कोळी, कुंभार, कोष्टी, ढोर, चांभार, सुतार, परीट आशा अनेक पोट जाती आहेत. 

       इंग्रजांनी लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीचा वेगळी जनगणना करून लिंगायत धमास न्याय देण्याचे काम केले होते. मात्र सन १९४७ स्वातंत्र्यानंतर लिंगायत धर्म हा पोरका करून त्याची मान्यता रदद करून लिंगायत धर्मावरती प्रचंड मोठा अन्याय केला आहे. आम्ही लिंगायत स्वतंत्र भारतामध्ये राहुन सुद्वा गेली 9२ वर्षे झाली आमची कोठेही गणती केली गेली नाही. आम्हा लिंगायतांची महाराष्ट्रामध्ये आसणा-या १२ कोटी लोकसंख्यापैकी फक्त ४0 लाख लोकसंख्या लिंगायतांची असुन लिंगायत धर्मातील सर्व जातीप्रमाणे अल्प संख्यांक दर्जा मिळाला नाही, ही फार मोठी शोककांतिका आहे . संविधानामधील कलम २५, कलम २८, कलम २९ व कलम ३० या कलमांप्रमाणे आम्हां लिंगायत मुलांना शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये अल्प संख्यांकाच्या सवलती मिळणे गरजेचे होते. मात्र ७२ वर्षे झाली आम्ही यापासुन वंचित आहोत. महाराष्ट्र मध्ये सर्व धर्मियांसाठी शासनाने महामंडळ स्थापन करून त्या-त्या धर्मातील पोट जातीना न्याय देणेस काम केले आहे. मात्र लिंगायत धर्माचे धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून लिंगायत धर्मातील होतकरू विदयार्थ्याना उद्योग करणेस मदत केली जात नाही हा आमच्या लिंगायत धर्मातील मुला- मुलीच्यावरती मोठा अन्याय केला जात आहे. तरी या अधिवेशनामध्ये माहात्मा वसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करावी.

Post a Comment

0 Comments