खैरावमध्ये गॅस स्फोट:; आमदार विक्रमसिंह सावंत याचा मदतीचा हातजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील खैराव येथे गॅसचा स्फोट होवून दीपक बाळू ढगे यांचे पत्र्याचे घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेत ढगे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

         यावेळी या घटनेची माहिती मिळताच तातडीने आमदार विक्रमसिंह सावंत, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग, खैरावचे सरपंच राजू घुटूकडे, कोडीबा घुटूकडे, भारत शिरसागर, जैनू मुलाणी, येळवीचे उपसरपंच सुनील अकंलगी, दीपक अकंलगी, प्रवीण तोडकर, आदीजन घटनास्थळी भेट देऊन ढगे कुटूंबियांना धीर देत, स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तू देण्यात आलय. खैराव येथे दीपक ढगे यांची वस्ती आहे. पत्र्याचे घर आहे. शनिवारी ढगे यांच्या घरातील महिला या गॅसवर दूध तापवत असताना गॅसने अचानक पेट घेतला व काही कळायच्या आत गॅसचा स्फोट झाला. या गॅस स्फोटात काही वेळातच पत्र्याच्या शेडला आगीने वेढले या दुर्घटनेत ढगे यांनी घरात आणून ठेवलेले रोख १ लाख ७६ हजार रुपये, तीन तोळे सोने, दीड ते दोन लाखाचे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.

        यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत बोलताना म्हणाले की, ढगे कुटुंबियांना शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी पर्यत करू असे आश्वासन आमदार सावंत यांनी दिले.

Post a Comment

0 Comments