कागनरी येथे राहत्या घरास गॅसचा स्फोट ; जीवितहानी नाही । श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना धावली मदतीलाजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील कागनरी येथे गॅसचा स्फोट झाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. कागनरी येथील देवाप्पा हरिबा राठोड यांच्या छप्परवजा घरात गॅसचा स्फोट झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गॅस स्फोटात अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले असून राठोड कुटूंबीय उघड्यावर पडले आहे.

        कागनरी येथील देवाप्पा राठोड यांच्या छप्परवजा घरात गॅसचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य कागनरी येथे पोहचले. त्यांनी या स्फोटाची व राठोड कुटूंबियांची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांना सांगितले. तुकाराम बाबा ही राठोड कुटूंबियांच्या मदतीला धावून आले. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते राठोड कुटूंबियांना रोख रक्कम तसेच संसारपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. 

         यावेळी कागनरीचे माजी उपसरपंच अशोक मोरे, गावचे पोलिस पाटील भिमु कांबळे, मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ, सिध्दराया मोरे, सुभाष राजे व मानवमित्र संघटनचे सदस्य उपस्थित होते. या स्फोटात गरीबाचा संसार उघड्यावर पडला आहे. तेव्हा त्यांना तातडीने सर्वांनी मदत करावी असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments