काराजनगी येथे घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही


जत,प्रतिनिधी: काराजनगी ता.जत येथे दुपारी १ वाजताच्या च्या सुमारास चिमाबाई सुरेश घाटे (कोळी) यांचे छप्पर वजा राहते घर आगीत जळून खाक झाले. यामध्ये अंदाजे १ लाख ६५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

        घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की, काराजनगी गावा शेजारी चिमाबाई घाटे यांचे छप्पर वजा घर आहे. सध्या ज्वारीच्या सुगीचे दिवस असलेने घरी कोणीच नसताना घर आगीत जळून खाक झाले. ग्रामस्थांनी आग विजवणयाचा प्रयत्न केला मात्र कडक उन्हात आगीने भयानक रूप धारण केल्याने आग विजवण्यास अपयश आले. 

         यामध्ये चार पोती धान्य, दीड तोळे सोने, १५०० पेंडी कडबा, रोख रक्कम ५ हजार कपडे व जीवनावश्यक वस्तु व संसरूपयोगी साहित्य जळून खाक झाले. सदर घाटे कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकामगार तलाठी अभिजित सोनपरोते यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.

Post a Comment

0 Comments