भाऊसाहेब फुंडकर योजनेतील शासकीय अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावी या मागणीसाठी जत तालुका मनसेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण


जत,प्रतिनिधी: भाऊसाहेब फुंडकर योजनेतील लाभार्थी म्हणून निवड झालेल्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात यावी या मागणीसाठी जत तालुका मनसेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
          याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,  सन २०१९-२० या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुंडकर योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून निवड झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान अद्याप मिळाले नाही. प्रस्ताव सादर केल्यानंतर त्वरीत अनुदान देण्यासाठी तालुका स्तरावर समिती नेमली होती, या समितीने आपला अहवाल अधिकाऱ्याना सादर केला आहे, परंतु अनुदान मिळाले नाही.
          यासंदर्भात उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदन देवून अनुदानाची मागणी करण्यात आली होती. परंतु पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्याप अनुदान वर्ग करण्यात आलेे नाही. त्यामुळे सदर योजनेतील लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. सदर योजनेतील निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
          यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार ,
जत तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण कोळी, मनसे जत तालुका उपाध्यक्ष अजय कुटे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष मिलिंद टोणे, बलभीम पाटील, सुरेश बिळूर, विनायक माळी, संजय टोणे, नामदेव यादव, मनोज साळे, प्रकाश माने, संतोष खिलारे आदीजण या लाक्षणिक सअहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments