जत तालुक्यातील तिकोंडी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट आगीत सुमारे सात लाखाचे नुकसान । कोणतीही जीवित हानी नाही


जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील तिकोंडी येथे गॅसचा स्फोट होऊन काशीबाई बसाप्पा चौधरी यांचे छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले आहे. यामध्ये सुमारे सात लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या स्फोटत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

         घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, तिकुंडी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौधरी वस्ती येथे काशीबाई चौधरी यांचे कुटुंब राहते. रात्री अचानक काशीबाई यांच्या आईला लकवा मारल्याने सकाळी कराड या ठिकाणी उपचारास नेण्यासाठी तिकुंडी गावात आले होते. परत जाऊन पाहिले असता गॅसचा स्फोट होऊन छप्पर वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले होते. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. स्फोट इतका भयानक होता की, दोन किमी परिसरात त्याचा आवाज घुमत होता. स्फोटाचा आवाज ऐकून आग विजवण्यासाठी गावातील लोकांनी धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. 

          काल शुक्रवारी माडग्याळ जनावर बाजारात शेळी विकून आलेले रोख २५ हजार रुपये, संसार उपयोगी साहित्य, २० हजर रुपये किमतीची बागेची औषधें ,२ तोळे सोने, २ तोळे चांदी व ५ पोती ज्वारी व कडधान्ये जळून अदाजे ५ ते ७ लाखापर्यत नूकसान झाले आहे. वेळीच सावध झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरी कुटुंबाकडे स्वतःचे कपडे सोडून त्यांच्याकडे काहीच शिल्लक उरले नाही. हे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. ह्या घटनेने परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत. पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त प्रशासन व इतर माध्यमातून मदत करावी अशी मागणी चौधरी कुटुंबातून होत आहे. घटनास्थळी उशीरा पर्यत  पंचनामासाठी महसूल विभागाचे अधिकारी कोणीच फिरकले नाही.

Post a Comment

0 Comments