"वैभवशाली जत" या वेब सिरीयलचा शुभारंभ । जतचा वैभवशाली इतिहास जगभरात पोहोचेल: आमदार विक्रमदादा सावंत


जत,प्रतिनिधी: 'वैभवशाली जत' या वेब सीरियलच्या माध्यमातून जत तालुक्याचा वैभवशाली इतिहास जगातील कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केला.

जत तालुक्याच्या इतिहासाचा सुवर्णपट उलघडणारी वैभवशाली जत ही वेब सिरीयल लवकरच प्रदर्शित होत आहे. या सिरीयलचे टायटल साँग, ट्रीजर पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी आमदार सावंत, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे,  तहसीलदार सचिन पाटील, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रवींद्र अरळी, अॅड. प्रभाकरभाऊ जाधव,  जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, राष्ट्रवादी आघाडी अध्यक्षा मीनाक्षी अक्की, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, बाबासाहेब कोडग, दिनकर पतंगे, बाजी केंगार, संतोष देवकर आदी उपस्थित होते. 

        यावेळी आमदार सावंत म्हणाले, दुष्काळी,  मजुरांचा तालुका म्हणून जतला हीनवले जाते. वेगळ्या नजरेने जतकडे पाहिले जाते. वास्तविक जत तालुक्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तालुक्याचा हा वैभवशाली इतिहास आता वेब सिरीयलच्या माध्यमातून जगापुढे येईल.

        सुरेश शिंदे म्हणाले, वैभवशाली जत ही जतची खरी ओळख आहे. अनेक राजे, साधू संत, क्रांतिकारकांची ही भूमी आहे. हा इतिहास सर्व जगासमोर ठेवण्याचे कार्य वेब सिरीयलच्या माध्यमातून सुरू आहे. कार्यक्रमाचे सप्रास्ताविक दिनराज वाघमारे यांनी केले. तर पाहुण्यांचे स्वागत किरण जाधव, बादल सर्जे, सोमनिंग कोळी, श्रीकृष्ण पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments