जत मध्ये बेकायदा वाळू तस्करी करणारा डंपर पकडलाजत,प्रतिनिधी: जत शहरात बेकायदा वाळू वाहतूक करत असलेला डंपर तहसीलदार सचिन पाटील यांनी पकडला. जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी, बागलवाडी, वाळेखिंडी परिसरातून बेकायदा वाळू तस्करी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन पाटील यांनी शनिवारी रात्री गस्त सुरू केली होती.

           जत शहरालगत असलेल्या सैनिक नगर नजिक सिंगनहळ्ळी हून वाळू भरलेला एक डंपर येत असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांच्या पथकाला माहिती मिळाली होती. पाटील यांच्या पथकाने सापळा रचून डंपर पकडत पोलीसांच्या ताब्यात दिला. डंपरमध्ये चार ब्रास वाळू होती. डंपरला सुमारे चार लाख दंड प्रस्तावित केला आहे.

Post a Comment

0 Comments