शासनाने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक शेतकर्यांला अनुदान देण्यात यावे- संभाजी ब्रिगेडजत/प्रतिनिधी: जत तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रत सन २०२० साली झालेल्या अतिवृष्टी मध्ये शेतकर्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिला कोरोना महामारीचे संकट आणि त्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेतकरी देशोधडीला लागला. असे असताना महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांना नुकसानीच्या प्रमाणे अनुदान द्यायला पाहिजे होते, तेवढे जाहीर न करता यामध्ये शेतकर्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तुटपुंजे अनुदान जाहीर केले. हेक्टरी जिरायत व अश्वासित सिंचनाखालील पिके १० हजार व बहुवार्षिक पिकांना हेक्टरी २५ हजार रूपये न देता फक्त  २ ते साडे सात हजार इतके अत्यंत कमी अनुदान देऊन शेतकर्यांचा अपमान करण्याचे काम स्थानिक पातळीवरील प्रशासन करीत आहे. पहिलेच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असताना महाराष्ट्रात या कारणाने शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले असतानाच शेतकर्यांना अशा प्रकारे आपण वागणुक देत आहात. याचा अर्थ की, शेतकर्यांना आत्महत्या करण्याकरिता प्रशासनच प्रोत्साहन देत आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवरील कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक व संबधित अधिकारी यांच्या संगनमताने ह्या अनुदानाच्या याद्या तयार करून या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत करण्याचे काम हे करत आहेत.

        जत तालुक्यातील प्रत्येक गाव पातळीवरील अनुदान यादीची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे यादी दुरूस्त करून जिरायत व अश्वासित सिंचनाखालील पिके रू १० हजार व बहुवार्षिक पिकांना हेक्टरी २५ हजार रूपये प्रमाणे शेतकर्यांना अनुदान देण्यात यावे. तसेच ज्या शेतकर्याचे जास्त नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे होऊन सुध्दा त्यांना अनुदान अद्याप मिळाले नाही. तरी नुकसानग्रस्त जत तालुक्यातील सर्व शेतकर्यांना लवकरात लवकर जिरायत व अश्वासीत सिंचनाखालील पिक अनुदान मिळावे. अन्यथा संभाजी ब्रिगेड शेतकर्यांसह तिव्र आंदोलन करण्यात  येईल अशाप्रकारचे निवेदन जतचे तहसिदारसो सचिन पाटील यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी दिले. यावेळी जत तालुका कार्याध्यक्ष खंडू शिंदे, तालुकाउपाध्यक्ष रोहित चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments