आटपाडी तालुक्यातील जांभुळणी ग्रामपंचायत वेगवेगळे व नावीन्यपूर्ण उपक्रम वारंवार राबवत असते. त्यामध्ये दुष्काळात भाई संपतराव पवार यांच्या माध्यमातून चालवलेले पुण्यकर्म चारा दान केंद्र असेल, किंवा आरोग्याच्या बाबतीत बळिराजा फाऊंडेशनच्या माध्यमातून घेतलेली वेगवेगळी रक्तदान, नेत्रदान शिबीरे असतील या ग्रामपंचायत मार्फत लाॅकडाऊनमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणुन फळपालेभाज्या प्रतवारी तसेच विक्री करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. व यामुळे त्याच भागातील शेतकरी लोकांना योग्य तो दर मिळाला होता.
लाॅकडाऊन जाहीर झाले आणि युवकांचे रोजगार गेले. मुंबई, पुणे तसेच इतर छोट्या मोठ्या शहरात उदरनिर्वाह करण्यासाठी गेलेले युवक स्वगृही परतले.
कोरोणाच्या महामारीत रोजगार मिळणं शक्य नव्हतं, त्यामुळे जांभुळणी ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ संगिताताई मासाळ यांनी गावांतील युवकांना एकत्र करून पाच बंधार्यावर ठेका पध्दतीने मत्स्यशेती करण्यास युवकांना प्रवृत्त केले, त्यांना बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांनी मत्सबीजापासुन ते मत्सविक्रीपर्यंत सर्व मार्गदर्शन केले. गावातील युवकांनी प्रेरित होऊन यामध्ये हिरीरीने भाग घेतला. जांभुळणी गावांमध्ये एकुण पाच बंधार्यामध्ये ही मासेमारी सुरू असुन यामधून ग्रामपंचायत जांभुळणीला एका बंधार्याकडुन साधारण पणे एक हजार रूपये इतके मासिक उत्पन्न मिळते व २५-३० युवकांना उत्तम प्रकारे रोजगार उपलब्ध होत आहे. हा प्रोजेक्ट विधानपरिषदेचे आ. गोपिचंद पडळकर यांनी विधीमंडळात मांडला आणि या बंधार्याला पर्यटनाचे स्वरूप आले. हा प्रोजेक्ट पाहण्यासाठी दुरहुन लोक येत आहेत. सर्वजन सरपंच सौ मासाळ यांचे कौतुक करत आहेत. तरूणांना रोजगार मिळाल्याने तरूण आनंदी आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीला ही चांगला कर मिळत असल्याचे बोलले जात आहे. आ.पडळकर यांनी विधानपरिषदेत जांभुळणी पॅटर्न महाराष्ट्रभर लागु करा. अशी मागणी केली होती, त्याला प्रतिसाद देत मत्सव्यवसाय मंत्री यांनी हा प्रोजेक्ट मार्गदर्शनासाठी घेऊ असे कळविले आहे. यामुळे जांभुळणीच्या सरपंच सौ मासाळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मी सुशिक्षित बेरोजगार युवक असून जांभुळणी ग्रामपंचायत व सरपंच सौ संगिताताई मासाळ यांच्या विशेष प्रयत्नातून आम्ही मासेमारी कडे वळलो आज आम्हाला रोजगार उपलब्ध होत असुन आम्ही सक्षम बनत आहोत....
- ओंकार गुरव, मत्स्यशेती केलेला युवक
आमच्या गावात १२ बंधारे आहेत, त्यातील ५ बंधार्यात थेंबभर पाणी नव्हते आम्ही श्रमदानातून व लोकसहभागातून बंधारे व्यवस्थित केले व युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि येथिल पशुपालकांना कायमस्वरूपी बंधार्यामध्ये पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मासेमारी करण्याचे नियोजन केले. आणी भविष्यात देखील गावाचा नावलौकिक वाढेल असे काम करू.
-भाई शिवराम मासाळ, अध्यक्ष बळीराजा फाऊंडेशन
आम्ही हाती घेतलेल्या प्रोजेक्टमधुन जांभुळणी ग्रामपंचायत ला चांगला कर मिळणार असुन, युवकांना रोजगार उपलब्ध होतोय यामुळे मुंबई पुणे या ठिकाणी जाणारे युवक गावीच सक्षम बनतील. तसेचं तरूणसाठी व महिलांच्या साठी नवनवीन प्रोजेक्ट राबविण्यात येणार तशी तयारी अंतीम टप्यात आली आहे.
-सौ संगिताताई मासाळ, सरपंच ग्रामपंचायत जांभुळणी
0 Comments