जतच्या विकासासाठी मत भेद नको; कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण, अशोक कोळी


जत,प्रतिनिधी: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व शिवसेना व इतर मित्रपक्ष एकमेकांच्या हातात हात घेवून महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंत चांगले काम करत आहे. असे असताना राज्याचे जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक जर जत तालुक्यात येवून गोरगरीबांचे व सामान्य जनतेच्या अडी अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असतील, तर जत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने चांगलेच आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष या नात्याने विद्यमान आमदार यांना याचा नक्कीच फायदा होईल. महाविकास आघाडी घटक पक्षातील आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून जत तालुक्याचा सर्वांगीन विकासासाठी महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यात असे चांगले काम करत आहे. तसेच काम जत तालुक्यामध्ये घडावे हीच विद्यमान आमदारांच्या कडुन अपेक्षा. 

        यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे, हेमंत खाडे, पवन कोळी, हेमंत चौगुले, संतोष देवकर, राजेसाहेब डफळे, रुपेश पिसाळ, जयंत भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments