जतमध्ये गुंठेवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार पुन्हा सुरू होणार? । अर्थपूर्ण तडजोडीची रंगली चर्चा ! इस्टेट एजंटांना दुय्यम निबंधकांचा ग्रीन सिग्नल?


जत,प्रतिनिधी: जत येथील काही कालावधीसाठी बंद करण्यात आलेले गुंठेवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यासाठी येथिल दुय्यम निबंधकांनी इस्टेट एजंट यांना ग्रीन सिग्नल दिल्याने गुंठेवारी जमिन व प्लाॅटचे खरेदी व्यवहार पुन्हा सुरू होणार असल्याने इस्टेट एजंटामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर बंद पडलेले गुंठेवारी व्यवहार सुरू होण्यासाठी मोठी अर्थीक तडजोड झाल्याची चर्चा जत तालुक्यात सुरू आहे.

         याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत शहरातील जत घाटगेवाडी रस्ता व जत यल्लमादेवी यात्रा परिसर या ठिकाणी इस्टेट एजंटाकडून मोठ्या प्रमाणात गुंठेवारी जमिनीचे प्लाॅटींग करून त्याची विक्री सुरू आहे. जत तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील अनेक इस्टेट एजंटानी येथील स्थानिक शेतकरी यांच्या कडून त्यांच्या शेतजमिनी विकत घेऊन त्यावर गुंठेवारी पद्धतीने प्लाॅटींग केले आहे. हे प्लाॅटींग करित असताना त्यानी शासनाच्या नियम व अटीचे पालन केले नाही. गुंठेवारी प्लाॅटमध्ये सरकारी नियमानुसार रस्ते, ओपनस्पेस तसेच बालवाडीसाठी व इतर उपक्रमासाठी आरक्षित जागा ठेवलेली नाही. तसेच नगररचना कार्यालयाकडून प्लाॅटींगसाठी मंजूरीही घेण्यात आली नाही. त्यामुळे हे प्लाॅटींग नियमबाह्य असे झाले असून, जतचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जतचे दुय्यम निबंधक यांना नियमबाह्य गुंठेवारी जमिन व प्लाॅटच्या नोंदी न करण्यासंदर्भात सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु नव्याचे नऊ दिवस या प्रमाणे दुय्यम निबंधक यानी एक आठवड्यांसाठी गुंठेवारी जमिन व प्लाॅट च्या नोंदणी बंद ठेवल्या होत्या.

        जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारी जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी गुंठेवारी जमिन व प्लाॅटचे दस्तऐवज करताना गुंठेवारी प्लाॅट खरेदी घेणारे पक्षकार यांना जमिन म्हणूनच सदरची मिळकत खरेदी करावी लागत असल्याने त्यांची मोठी फसवणूक होत आहे. गुंठेवारी प्लाॅट खरेदी करण्याच्या तयारीने आलेल्या पक्षकारांना त्यांच्या दस्तऐवजामध्ये जमिन म्हणूनच एक गुंठा, दोन गुंठे, तीन गुंठे असे क्षेत्र घालावे लागत असून चतुःसिमा लावून दस्ताची पूर्तता करण्यात येत आहे. परंतु गुंठेवारी प्लाॅट खरेदी घेणारे पक्षकार यांना त्यांच्या दस्तऐवजामध्ये प्लाॅट नंबर, प्लाटची मोजमापे प्लाॅटचे एकून क्षेत्रफळ तसेच प्लाॅटचा प्रमाणीत नकाशा हे अवश्यक असतानाही ते दस्तऐवजामध्ये न आल्याने पक्षकारांची मोठी लुबाडणूक व फसवणूक होत आहे. 

         त्यातच गुंठेवारी प्लाॅटींगमधिल काही मिळकती या जतचे ग्रामदैवत श्री. यल्लमादेवी यात्रेसाठी अरक्षित केलेल्या असल्याने त्याचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होवून त्या जागेवर मोठ्या इमारती ऊभ्या राहाणार असल्याने भविष्यात यात्रा भरविणे कठीण जाणार आहे. कारण या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करण्याची अट घालून तसे लेखी आदेश तत्कालीन जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत. त्यामुळे या जमिनी गुंठेवारीने खरेदी घेणारेंची मोठी फसवणूक सुरू आहे.         

जत येथिल आठवडाभर बंद असलेले गुंठेवारी जमिन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होण्यासाठी येथील इस्टेट एजंट यांनी सबंधित अधिकारी यांच्याशी मोठी आर्थिक तडजोड केल्यानेच हे व्यवहार पुन्हा सुरू होत आहेत. अशी चर्चा जत तालुक्यात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments