१४ एप्रिलपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करणार; आ. सावंत । जत येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबूतऱ्याचे भूमिपूजन


जत,प्रतिनिधी: जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे येत्या १४ एप्रिल पर्यंत पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने लवकरात लवकर काम संपवण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील आंबेडकर नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चाबूताऱ्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. जत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भव्यदिव्य असा होणार आहे. या ठिकाणी वाचनालय, त्याचबरोबर मॉर्निंग वाँक मार्ग तसेच जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज या महापुरुषांच्या पुतळा उभा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. १४ एप्रिल पर्यंत पुतळ्याचे अनावरण होण्यासाठी पुतळा समितीने पर्यंत करावे. अभ्यासिका उभारण्यासाठी लागेलती मदत करण्याचे आश्वासन दिले.

         डॉ. रवींद्र आरळी म्हणाले की, हे उद्यान जत शहराच्या वैभवात भर पडणारे असून तसेच जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व ग्रंथालय उभा केल्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ठरेल असे डॉ आरळी म्हणाले. रिपाईचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे म्हणाले, याठिकाणी पुतळा उभा करण्यासाठी गेल्या ३५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अनेक तरुण रस्त्यावर उतरले होते. अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पुतळ्याचे स्वप्न आज पूर्ण होत असून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी चाबूतऱ्याचा सर्व खर्च स्वतःच्या पैशातून दिलेला आहे, मी त्याचे आभार मानतो. यावेळी बोलताना माजी सरपंच अतुल कांबळे म्हणाले की, आज या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण होत असून त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे काम मार्गी लागावे अशी मागणी केली. 

        माजी बांधकाम सभापती भुपेंद्र कांबळे म्हणाले की, जतचे संस्थानिक श्रीमंत विजयसिंह राजे डफळे यांनी ५ मार्च १९३४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जत मध्ये आणण्यात आले होते. ही बाब जतकरांसाठी अभिमानाची आहे. याठिकाणी उद्यान होण्यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली. तर ज्यावेळी पुतळा समितीची बैठक बसली त्यावेळी चाबूताऱ्याचा खर्च कोणाकडून घ्यायचा हा प्रश्न पडला होता. पण जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांना शब्द देताच त्यांनी तात्काळ चाबूताच्यासाठी लागणार सर्व खर्च उचला मी त्यांचा आभारी आहे. असे सांगत हे उद्यान जतच्या वैभवात भर पडणारे याहे असे कांबळे म्हणाले.

         यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, डॉ.रवींद्र आरळी, नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, माजी सभापती भुपेंद्र कांबळे, विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड युवराज निकम, रिपाईचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय शिंदे, माजी सरपंच अतुल कांबळे, श्रीकांत शिंदे, शिक्षण सभापती प्रकाश माने, नगरसेविका जयश्री मोटे, नगरसेवक प्रमोद हिरवे, ईराना निडोनी, जनार्धन वाघमारे, अशोक कांबळे, हणमंत कांबळे गुरुजी, तुकाराम माळी, पापा सनदी, अविनाश वाघमारे, डॉ चंद्रमनी उमराणी, तम्मा सगरे, महादेव कोळी, मकबूल नदाफ, किरण शिंदे, अरुण साळे, दिपक कांबळे, संतोष भोसले, काका शिंदे, गणेश गिड्डे, आकाश बनसोडे आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments