महाविद्यालयाकडून सुरू असलेली सक्तीची वसुली थांबवा; संभाजी ब्रिगेड


जत,प्रतिनिधी: विद्यार्थ्यांना फी भरणेबाबत सक्ती न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून देखील काही शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून सक्तीने फी वसुल करत आहेत. जत येथील राजे रामराव महाविद्यालयाकडून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील फी विद्यार्थ्यांकडून सक्तीने वसूल केले जात आहे. महाविद्यालयाच्या सूचना फलकावरती तशी नोटीसही लावण्यात आली आहे. जर विध्यार्थी फी भारत नाहीत तर त्यांचे परीक्षा फार्म महाविद्यालयाकडून स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे.
         सक्तीने वसूल करण्यात येत असलेली फी थांबवण्यात यावी, याबाबतचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ .ए.के. भोसले याना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही राजे रामराव महाविद्यालय, जत येथील सुचना फलकावर लावलेली नोटीस वाचली, वाचून खेद वाटला वर्षभरापासून covid-19 मुळे जगणार की मरणार हे माहीत नसताना, तसेच लाकडाऊन झाल्यामुळे तुमच्यासह सर्व जण गेल्या दहा महिन्यापासून फिजिकली घरीच आहात. अनेक विद्यार्थी हे शेतकरी व गरीब कुटुंबातील असल्यामुळे तसेच या वर्षी कोरोन बरोबरच अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे. त्यामुळे फी न भरल्या कारणाने आपण विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेऊ नये. प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांकडून अर्धी फी घेतलेली आहे. ती फी विद्यार्थ्यांनि आर्थिक अडचणी असताना देखील भरलेली आहे. कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले असता, तुमच्याकडून त्यांना फिबाबत सक्ती केली जात आहे. व त्यांचे परीक्षा फार्म तुमच्या कार्यालयाकडून स्वीकारले जत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे फार्म भरून न घेतल्यास विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे होणारे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व करिअरचे आयुष्यातील एक वर्ष वाया गेल्याने ताण-तणाव येऊन विद्यार्थ्यांच्या जिवास धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदार आपण आपले कार्यालय, महाविद्यालय तसेच संस्था जबाबदार राहील.
          महाविद्यालयाच्या सूचना फलकावरील नोटीस क्रमांक सात मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता ई.बी.सी व भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना नियमानुसार पूर्णपणे फी भरण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. तरीही नोटीस बोर्डवरील मुद्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अर्धी फी भरलेले आहे. ई.बी.सी स्कॉलरशिप फॉर्म भरलेले आहेत. तुमच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना नंतर फी भरण्याची गरज नाही. तरीदेखील विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कार्यालयाकडून अडवले जात आहे. तसेच आपल्याकडून फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी द्यावी, विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सक्ती करू नये, व या निवेदनाचा विचार करावा. या अधिक जर आपणाला फी हवी असल्यास जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त सो, शिक्षण सचिवसो तसेच महाराष्ट्र सरकारकडून मागून घ्यावी तसेच विद्यार्थ्यांना फी सक्ती केल्याने परीक्षा फॉर्म न भरून घेतल्यास, विद्यार्थ्यांचे नुकसान केल्यास, संभाजी ब्रिगेडतर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आंदोलन करण्यात येईल. अशा प्रकारचे निवेदन राजे रामराव महाविद्यालय जतचे प्रभारी प्राचार्य डॉ .ए.के. भोसले सर यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष श्रेयश नाईक, तालुका उपाध्यक्ष  रोहित चव्हाण, जत शहर अध्यक्ष प्रमोद काटे, तालुका कार्याध्यक्ष खंडू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संदिप नाईक यांनी दिले.

Post a Comment

0 Comments