भिवर्गी ओढापात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर अप्पर तहसीलदार यांची कारवाईजत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील भिवर्गी -तिकोंडी ओढा पात्रात अवैध वाळू उपसा करत असताना मंगळवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर पकडून अंदाजे दीड लाख रुपये दंड करणार असल्याची माहिती अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी दिली. 

       जत तालुक्यातील बोर नदी पात्र ६४ किलो मिटर अंतराचे आहे. या बोर नदीतून वाळू उपसा होत असल्यामुळे सध्या वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांंचे मोठे नुकसान होत आहे. वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महसुल विभागाला कारवाईचे आदेश मिळाले होते. संखचे अप्पर तहसिलदार म्हेत्रे व त्यांच्या पथकाला रात्री २ वाजता गस्त घालताना भिवर्गी-तिकोंडी ओढा पात्रात अवैध वाळू उपसा करीत असताना बिना नंबरचा ट्रॅक्टर आढळून आला असता, ट्रॅक्टर पकडून त्याच्यावर कारवाई करून  तहसिल आवारात लावण्यात आला आहे.

          अप्पर तहसिलदार हणमंत म्हेत्रे ,तलाटी गणेश पवार, पोलीस इंद्रजित गोदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments