जत महसूल कर्मचाऱ्यांचा मुजोरीपणा; कार्यालयीन वेळेत एकही कर्मचारी नसतो हजर । महसुल कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचे बंधन घालण्यात यावे; मनसेच्या वतीने जत तहसीलदारांना निवेदन


जत,प्रतिनिधी: जत महसूल कर्मचाऱ्यांचा मुजोरीपणा वाढला असून कार्यालयीन वेळेत एकही कर्मचारी आपल्या दालनात हजर नसतो. महसुल कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेचे बंधन घालण्यात यावे या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने जत तहसीलदारासो याना देण्यात आले. यावेळी मुकेश पवार सांगली जिल्हा उपध्यक्ष, शरद चव्हान जत शहर उपध्यक्ष, मिलिंद टोने जत तालुका विध्यर्ती सेना उपध्यक्ष, मनोज साळे मनसे विद्यार्थी सेना जत शहराध्यक्ष, शरद चव्हान मनसे जत शहर उपध्यक्ष आदीजन उपस्थित होते.          महाराष्ट्र शासनाने ५ दिवसाथा आठवडा केला व पाच दिवसात कार्यालयीन कामकाजाची वेळ वाढविली व सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ अशी कार्यालयीन कामकाजाची वेळ असताना आज दिनांक ०८/०३/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजले तरी एकही कर्मचारी तहसिल कार्यालयात व उपविभागीय अधिकारी कार्याल जत यांचे कार्यालयात हजर न्हवते. तसेच तहसिल कार्यालयातील काही विभागाचे दरवाचे सुध्दा उघडलेले न्हवते. यापुर्वी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संबधीत कर्मचारी कार्यालयात उपस्थीत राहत नसलेबाबत वारंवार सदरची बाब शासनाच्या लक्षात आणुन दिली होती. परंतु सदर महसुल विभागातील मुजोर कर्मचारी हे 'ये रे माझ्या मागल्या' या सारखी तहसिल कार्यालयांची अवस्था झालेली आहे. सदर कर्मचा-यांवर अधिकाऱ्यांचा वचक नाही. कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात कमी व चहाच्या टपरीवर, तसेच आजुबाजुच्या हॉटेलमध्ये बसुनच ऑफीसचा कारभार चालवितात.


         संबधीत कर्मचारी कार्यालयात उपस्थीत नसल्यामुळे खेड्या पाड्यातुन आलेले लोक वारंवार हेलपाटे मारुन, त्यांना आर्थीक खर्चात टाकण्याचा महसुल कर्मचान्यांच्या उद्योग सुरु आहे. हा कारभार पाच दिवसात न सुधारल्यास मनसे स्टाईलने खळ्य खट्याक आंदोलन करण्यात येईल. तसेच कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईलने कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल. सदर लेट कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जाहीर सत्काराचे फोटोसह सर्व दैनिक वृत्तापत्रात प्रसिध्द करण्यात येईल व त्यांच्यावर कड़क कायदेशीर कारवाईसाठी योग्य तो पाठपुरावा मनसेकडून केला जाईल.

Post a Comment

0 Comments