ओंकार स्वरूपा तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा । देशाच्या शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान महत्त्वाचे- आमदार विक्रमसिंह सावंत


जत/प्रतिनिधी: येळवी ता.जत येथे ओंकार स्वरूपा तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर सी. व्ही. रमण यांच्या फोटोचे पूजन व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी प.सं.सभापती बाबासाहेब कोडग, उपसरपंच सुनिल अंकलगी, संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी, सचिव तथा ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील, संतोष स्वामी, नवनाथ पवार, तुकाराम सुतार, विजय कदम, प्रवीण तोडकर, सनमडी केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे (सर), महेश शिंदे (सर), सहशिक्षक दत्तात्रय चौगुले, नारायण जगदाळे, सौ.प्रियांका कदम, करण शेळके, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

         यावेळी आमदार सावंत म्हणाले की देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दर वर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्नांनी कृत्य प्रदर्शित करणे सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचे अंमलबजावणी करण्यासाठी हा विज्ञान दिन साजरा केला जातो. देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो. खरे तर धर्म आणि विज्ञान या दोन्ही बाबी मानवाचे जीवन अधिक चांगले व्हावे म्हणून जन्माला आल्या आहेत, आसे आ. सावंत यावेळी बोलताना म्हणाले.

        यावेळी आमदार सावंत यांनी ओंकार स्वरूपा कॉलेज मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची प्रात्यक्षिकासह, सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे कौतुक करत विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले त्याबरोबर दैनंदिन जीवनात विज्ञान आत्मसात करण्याचे आव्हान केले. विज्ञान हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसावे ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपला अविभाज्य भाग असला पाहिजे. विज्ञान जन्म घेते वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यासाठी व्यक्तीला का...? हे प्रश्न पडले पाहिजेत याबरोबर अनेक प्रश्न विचारत आमदार सावंत यानी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

         यावेळी विद्यार्थ्यांनी मिनी ग्रीन हाऊस, सोलर स्ट्रीट लाईट, ईको इनव्हायरमेंट मॉडेल, स्मार्ट सिटी, वर्किंग माॅडेल टबाईन व डॅम वर्कींग माॅडेल तसेच सोलर बोट इत्यादी प्रयोग प्रात्यक्षिकेसहित सादर केली. यावेळी प्रथम क्रमांक सोलर स्ट्रीट लाईट, द्वितीय क्रमांक डॅम वर्किंग मोडेल या प्रयोगाला देण्यात आले. पारितोषिक वितरणासाठी बाळू तांबे परिवार, सनमडीचे केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे (सर), ग्रा.पं.माजी सदस्य महेश शिंदे (सर), संस्थेचे सचिव संतोष पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments