सिध्दार्थ पब्लिक स्कूल जत या सी.बी.एस.ई शाळेत लीड़ स्कूल (Lead School) सॉप्टवेअर चे उद्दघाटन संपन्न


जत/प्रतिनिधी: जत येथील श्री.उमाजीराव सनमडीकर मेडीकल फोडेंशन जत, संचलित सिध्दार्थ पब्लिक स्कूल या सी.बी.एस.ई शाळेत दिनांक 19-02-2021 रोजी लीड स्कूल (Lead School ) सॉप्टवेअर चे उद्वघाटन उत्साहात संपन्न झाले.

       सिध्दार्थ पब्लिक स्कूल ही जत मधील एकमेव सी.बी.एस.ई मान्यता प्राप्त शाळा असून जत सारख्या ग्रामीण भागातील मुलांना केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याच्या अभ्यासक्रमात जास्तीजास्त उपयोग व्हावा. संगणकाचा व टॅबचा उपयोग करुन ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम मुलांना करता यावा, यासाठी भारतातील लीड स्कूल (Lead School) या कंपनी च्या अंतर्गत 1500 पेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा व सहा लाखापेक्षा जास्त विदयार्थी संख्या, दहा हजार च्या वर शिक्षक, 400 च्या वर शहरामध्ये व 20 राज्यामध्ये लीड स्कूलचे सॉप्टवेअर कार्यरत आहे. अश्या अध्यावत प्रणालीमध्ये सिध्दार्थ पब्लिक स्कूलच्या विदयार्थ्याना डिजिटल अभ्यासक्रम, डिजिटल पुस्तके, राज्यस्तरावरील स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी, नियमित सराव व परीक्षा, शिक्षकासाठी ऑनलाईन वर्ग, विदयार्थ्याचे शंका व समाधानासाठी वेगळे क्लास अश्या प्रकारच्या सुविधा विदयार्थ्याना मिळणार आहेत. तंत्रज्ञानायुक्त लीड स्कूल सॉप्टवेअर प्रणालीमध्ये सिध्दार्थ पब्लिक स्कूल हया शाळेचा प्रथमच समावेश झाला आहे. 

       सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर साहेब, लीड स्कूलचे तंत्र सहाय्यक अनामिका मॅडम, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments