जत तहसीलदारांची दुचाकीवरुन वाळू माफियांवर धाडसी कारवाई । पाच वाहने ताब्यात


जत/प्रतिनिधी: जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी येथील कोरडा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करण्याऱ्या ठिकाणी छापा टाकून ५ वाहने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री प्रांताधिकारी प्रशांत आवटे याच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन पाटील यांच्या पथकाने यांनी केली आहे. या कारवाई मध्ये एक जेसीबी, तीन टेम्पो व एक डंपर अशी एकूण पाच वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. सुमारे आठ लाखाचा दंड या वाहनांवर्ती करण्यात आला आहे.

         सदरची कारवाई प्रांताधिकारी प्रशांत आवटे, यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन पाटील, मंडळ अधिकारी नंदकुमार बुकटे, प्रशांत बुचडे, तलाठी दुष्यत पाटील, विशाल उदगिरे, राजेश चाचे, निलित पाटील, अनिल हिप्परकर, स्वप्नील घाडगे, अभिजित सोनपुराते, बागलवाडीच्या सरपंच सौ. लक्ष्मी खांडेकर, कोतवाल प्रवीण काळे व स्थानिक पोलीस पाटील यांनी केली आहे.

         याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील कोरडा नदी पात्रात बेकायदेशीर बाळू उपसा मोठया प्रमाणत होत आहे. तहसिलदार सचिन पाटील यांनी वाळू तस्करांना लक्ष्यात येऊ नये म्हणून शुक्रवारी रात्री मोटरसायकलवरून प्रवास करत बाळू उत्खनन करण्यात येत असलेल्या ठिकाणी छापा टाकला, सदरची कारवाई पहाटेपर्यंत सुरूच होती. वाळू उत्खनन करणाऱ्या ठिकाणी एक जेसीबी दिसून आला. तस्करी विरोधी पधक आल्याचे समजताच वाहने चोरट्या मार्गाने पळवू लागले. दरम्यान बेकायदेशीर चाळू भरलेला डंपर वेगाने जात होता. सिंगनहळी येथील महादेव मंदिराजवळ डंपरला वळसा न बसल्याने डंपर जागीच पलटी झाला. या डंपरमध्ये तीन ब्रास बाळू भरली होती. याचा पंचनामा करण्यात आला आहे. थोड्याच अंतरावर मोहन खिलारे यांच्या मालकीचे व वापरात असणारी टेम्पो शिंदे यांच्या घराच्या पाठीमागे सापडला आहे. काही अंतरावर असलेले हनमत खिलारे व मोहन खिलारे यांचे देखील टेम्पो ताब्यात पेऊन जत पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहे. 

         जप्त केलेल्या बाहनांना सुमारे आठ लाख दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. बाळू उत्खनन केलेल्या ठिकाणी मोजमापे घेऊन दंडाची रकम निश्चित केली जाणार असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.


तहसिलदारांचा मोटार सायकल प्रवास:-
तहसीलदार सचिन पाटील यांनी मोटारसायकल वरून प्रवास करत वाळूमाफियांच्या खबर्यांना चकमा देत, मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे वाळू माफियांना चाफ बसण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments