सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज याचे जयंतीनिमित्त जत मध्ये वृक्षारोपणजत/प्रतिनिधी: संत निरंकारी मिशनच्या वतीने बाबा हरदेवसिंहजी यांच्या ६७ व्या जन्मदिनानिमित्त जगभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण अभियाना अंतर्गत २१ ते २३ फेब्रुवारी, २०२१ दरम्यान प्रत्येक निरंकारी परिवाराने कमीत कमी एक रोप लावावे व त्याचे तीन वर्षापर्यंत संगोपन व संरक्षण करावे अशी प्रेरणा देण्यात आलेली आहे. या अभियाना अंतर्गत जत शाखेच्या वतीने तालुक्यात पाचशेहून अधिक रोपे लाऊन वृक्षारोपण करण्यात आले देशभरातील मिशनच्या ३००० शाखांच्या माध्यमातून सुमारे २ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने ‘वृक्ष लावतो प्रत्येक परिवार, प्रकृतीला देई उपहार’ असा संदेशही प्रसारित करण्यात आला.

          शांतीपूर्ण सह-अस्तित्वाची भावना जागृत करुन जगामध्ये मानव एकता, विश्वबंधुत्व आणि शांतीसुखाने युक्त वातावरण निर्माण करण्यासाठी आपले पूर्ण जीवन समर्पित करणारे निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनतर्फे देश-विदेशात वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण अभियान राबविण्याबरोबरच मुंबईपासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या डहाणू तालुक्यातील सायवण गावामध्ये कसाचा उतार याठिकाणी सोनाई नदीवर मिशनची सामाजिक शाखा असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनने तयार केलेल्या द्वितिय सिमेंट नाला बंधाऱ्याचे (CNB) लोकार्पण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments